सुस्साट अजितदादा यांच्यापुढं देवेंद्र फडणवीस यांचा लगाम, मुख्यमंत्री शिंदे यांनी काय घेतला मोठा निर्णय?
VIDEO | मुख्यमंत्र्यांच्या कामातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढत्या हस्तक्षेपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय, यापुढे देवेंद्र फडणवीस यांनी शेरा मारल्यानंतर फाईल मुख्यमंत्र्यांकजे जाणार
मुंबई, ३० ऑगस्ट २०२३ | सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामात हस्तक्षेप करत असल्याची राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे. राजकीय वर्तुळात अशाप्रकारच्या चर्चा रंगल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नवे आदेश जारी करण्यात आले आहे. यापुढे नवे प्रस्ताव अजित पवार यांच्याकडून फडणवीस यांच्याकडे जाणार आहेत. त्यानंतर नव्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीस यांनी शेरा दिल्यानंतर तो प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार आहे. नवीन कर बसविणे, मूल्य निर्धारण करणे, नवीन कर्ज काढणे असा प्रस्ताव असतील. वित्त मंत्र्यांची संमती नाही, असा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा कोणताही प्रस्ताव तर विधानमंडळात मांडावयाची विधेयके, जारी अध्यादेश, या बाबतचे प्रस्ताव असतील. याशिवाय किमान १५ असे विषय आहेत, ज्यांचा प्रवास दादा-फडणवीस-शिंदे असा होणार आहे.