मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवस तर झाला, मात्र अजूनही चर्चा आहे ती समर्थकांकडून देण्यात आलेल्या ‘या’ अनोख्या गिफ्टची…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त CM स्टाईल केक, बघा एक झलक
ठाणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 9 फेब्रुवारी रोजी राज्यभरात मोठ्या दणक्यात शिवसैनिक आणि समर्थकांकडून वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे समर्थकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. अशाच प्रकारे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एका समर्थकाने त्यांच्या वाढदिवसाच्या केकवर सजावट म्हणून एकनाथ शिंदे यांची खुर्चीवर विराजमान झालेली प्रतीकात्मक प्रतिकृती बनवून घेतली. ही मूर्ती प्लास्टिक आणि क्लेपासून बनवली असून केक ची शोभा वाढवण्यासाठी या प्रतीकात्मक मूर्तीचा वापर केला जात असल्याचे दुकानदार सरिता रसाळ यांच्याकडून सांगण्यात आले. बघा त्याचीच एक झलक….
Published on: Feb 10, 2023 07:37 AM
Latest Videos