'तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं...', शिवसेनेने सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसला सुनावलं

‘तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं…’, शिवसेनेने सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसला सुनावलं

| Updated on: Mar 27, 2023 | 6:29 PM

VIDEO | तर राहुल गांधी यांच्या थोबाडीत मारणार का? सावरकरांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं थेट आव्हान

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून राज्यभरात उद्धव ठाकरे यांना शिंदे-भाजप नेत्यांनी पूर्णपणे घेरल्याचे पाहायला मिळत आहे. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत, उद्धव ठाकरे यांना आव्हान दिल्याचे पाहायला मिळाले. बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या थोबाडीत दिली होती, ही हिंमत तुम्ही दाखवणार का? असा थेट सवाल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना केलाय. ठाकरे यांच्या शिवसेनेने सावरकरांवरून काँग्रेसला सुनावलेले बोल म्हणजे केवळ नाटक असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. ते म्हणाले, ‘फक्त सगळ्या बाजूंनी भडीमार झाला, तेव्हा हे उशीराचं शहाणपण होतं. बोलून काय होणार, हे कृतीतून दिसलं पाहिजे. हे ठरवून सुरु आहे. तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो, असं सुरु असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Published on: Mar 27, 2023 06:29 PM