चिंता करु नका... महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

चिंता करु नका… महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

| Updated on: Mar 18, 2024 | 5:34 PM

भाजपने राज्यातील 20 जागांसाठी उमेदवार जाहीर केले मात्र अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून उमेदवारांची घोषणा अद्याप झाली नाही. या जागावाटपासंदर्भात एकनाथ शिंदे यांना विचारणा करण्यात आली असता, त्यांनी महायुतीच्या जागावाटपाबाबत टेन्शन घेण्यासारखं नाही, अशी प्रतिक्रिया दिली.

मुंबई | 18 मार्च 2024 : महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी महायुतीचं जागावाटप कधी होणार? याबाबत शिंदेंनी स्पष्टच प्रतिक्रिया दिली. भाजपने राज्यातील 20 जागांसाठी उमेदवार जाहीर केले मात्र अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून उमेदवारांची घोषणा अद्याप झाली नाही. या जागावाटपासंदर्भात एकनाथ शिंदे यांना विचारणा करण्यात आली असता, त्यांनी महायुतीच्या जागावाटपाबाबत टेन्शन घेण्यासारखं नाही, अशी प्रतिक्रिया दिली. काही टेन्शन घेऊ नका. जागावाटप समन्वयाने आणि सन्मानजनक होईल. महायुतीत कुठलाही विवाद नाही. काही चिंता करु नका. योग्यवेळी निर्णय होईल. या राज्यात 45 पारचा आकडा महायुतीचा येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात मजबुत होतील, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.

Published on: Mar 18, 2024 05:34 PM