मुख्यमंत्री शिंदे नांदेड रूग्णालयातील घडलेल्या घटनेवर म्हणाले, ‘सरकारने ही घटना…’
VIDEO | नांदेडच्या शासकीय रूग्णालयात २४ तासात २४ मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर राज्य सरकारवर विरोधकांनी चांगलाच हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळत आहे. तर नांदेडच्या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'याप्रकरणाची सखोल चौकशी होईल आणि कोणाचा दोष असेल तर यावर कारवाई केली जाईल'
मुंबई, ३ ऑक्टोबर २०२३ | नांदेडमधील शासकीय रूग्णालयात झालेल्या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “नांदेडच्या घटनेला सरकारने गंभीरतेने घेतलं आहे. मी सकाळी अधिकाऱ्यांना बोलावलं होतं. प्राथमिक माहिती घेतलीय. रुग्णालयात १२७ प्रकारत्या औषधांचा पूर्ण साठा होता. कोणत्याही औषधांचा तुटवडा नव्हता. किंबहुना जास्तीच्या औषधांचा साठा रुग्णालयात होता. आवश्यक डॉक्टर आणि स्टाफ तिथे होता. पण जी घटना घडली ती दुर्दैवी आहे. या घटनेचा तपास केला जाईल. पूर्णतः चौकशी करण्यात येईल. आम्ही तिथे आमच्या मंत्र्यांना पाठवलं आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी होईल आणि कोणाचा दोष असेल तर यावर कारवाई केली जाईल”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पुढे ते असेही म्हणाले की, मृत्यू झालेल्या लोकांमध्ये वयोवृद्ध लोकं होती, रस्ते अपघातातील लोकं , लहान बालकं जी होती ती वजनानं कमी होती. मात्र यावर चौकशी केली जाईल आणि अधिकृत माहिती दिली जाईल, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.