देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जावं, संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…
VIDEO | एकनाथ शिंदे यांनी पुढचे पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री राहावं, तर देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जावं, संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली होती. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे.
ठाणे, ९ ऑक्टोबर २०२३ | एकनाथ शिंदे यांनी पुढचे पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री राहावं, तर देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जावं, असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं. यानंतर भाजपकडून शिरसाटांच्या वक्तव्यावर टीका करण्यात येत होती. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये 45 पेक्षा अधिक जागा राज्यात जिंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस आमच्या सोबत असणं आवश्यक आहेत. आम्ही तिघेही एक टीम म्हणून आवश्यक आहोत आणि आगामी विधानसभा निवडणूक आम्ही महायुती म्हणून नक्कीच जिंकू असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. इतकेच नाही तर महाराष्ट्रामध्ये चांगले निर्णय घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जे अनुभव आहेत. त्यासाठी महाराष्ट्राचा सर्वांगीन विकासासाठी आमच्या टीममध्ये आम्ही एक टीम म्हणून काम करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा विकास आवश्यक आहे. दिल्लीमध्ये खूप मोठे मोठे नेते आहेत. शेवटी हा निर्णय देवेंद्रजी यांचा वैयक्तिक असणार आहे. त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाचा असणार आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.