अब की बार ४५ पार… शिवसंकल्प अभियान-मेळाव्यातून मुख्यमंत्र्यांचा मोठा नारा अन् म्हणाले….
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे आज शिवसेनेच्या वतीने शिवसंकल्प अभियानाची सुरुवात. मिशन 48, शिवसंकल्प ध्येय भगव्या महाराष्ट्राचं या टॅगलाईन घेऊन या संकल्प अभियानाला सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही रत्नागिरी दौऱ्यावर असताना त्यांनी अब की बार ४५ पार...असा मोठा नारा दिला.
रत्नागिरी, ८ जानेवारी, २०२४ : सर्वसामान्यांचं जे आयुष्य आहे. त्यात मोठा बदल घडवून आणायचा आहे. ज्या चार राज्यात निवडणुका झाल्यात त्यावेळी इंडिया आघाडी खुशीत गाजरं खात होती. मात्र त्या चार राज्यातील जनतेने त्यांना मतदानाच्या निकालातून सडेतोड उत्तर दिलंय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दर्शवत मोदींची गॅरंटी स्वीकरली, असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आपल्या देशाची परदेशात जाऊन बदनामी करणारा इंडिया आघाडीतील नेता हवाय की या देशासाठी एक-एक क्षण समर्पित भावनेनं काम करणारा नेता हवाय? असा सवालही शिंदेंनी जनतेला केलाय. कुणाला काय मिळेल? यापेक्षा मी देशाला काय दिलं? हे महत्त्वाचं आहे असं म्हणत फिर एक बार मोदी सरकार आणि अब की बार ४५ पार…असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला. राजापुरात आयोजित केलेल्या शिवसंकल्प अभियान-मेळाव्यात ते बोलत होते.