विकासकामांमुळे काहींना पोटदुखी, मळमळ आणि धडधड, मुख्यमंत्र्यांचा निशाणा कुणावर?
येणाऱ्या काही दिवसात महापालिका निवडणुका होणार असून विकासाचं हे डबल इंजिन ट्रिपल इंजिनमध्ये रूपांतरित होईल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदेनी व्यक्त केला आहे.
बीएमसी जिंकून आता ट्रिपल इंजिनचं सरकार होणार आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माणसं असून मोदी यांच्याच सोबत राहणार असे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तर मुंबईत होत असलेल्या विकासकामांमुळे काहींना पोटदुखी, मळमळ आणि छातीत धडधड होत आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
तीन वर्षांत संपूर्ण मुंबईचा कायापालट करण्याचा या सरकारचा निर्धार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपात केंद्र सरकारचं भक्कमच पाठबळ आहे. केंद्रात आणि राज्यात आपलंच सरकार आहे. येणाऱ्या काही दिवसात महापालिका निवडणुका होणार असून विकासाचं हे डबल इंजिन ट्रिपल इंजिनमध्ये रूपांतरित होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १९ जानेवारी रोजी मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण झाले. यानंतर बीकेसीच्या मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभाही झाली. या कार्यक्रमात मुख्ममंत्री शिंदे यांचे देखील भाषण झाले, त्यावेळी शिंदे बोलत होते.