Eknath Shinde : मराठा आरक्षणावर तुम्हाला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, मुख्यमंत्र्यांनी ठाकरे यांना फटकारलं

Eknath Shinde : मराठा आरक्षणावर तुम्हाला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, मुख्यमंत्र्यांनी ठाकरे यांना फटकारलं

| Updated on: Oct 31, 2023 | 5:44 PM

cm eknath shinde on uddhav Thackeray : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिंदे सरकारवर जोरदार निशाणा साधला. मराठा समाजाच्या आरक्षणाचे मारेकरी खऱ्या अर्थाने तुम्ही आहात, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय.

मुंबई, ३१ ऑक्टोबर २०२३ | सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. मराठा आरक्षणावर बोलण्याचा उद्धव ठाकरे यांना नैतिक अधिकार नाही. कारण त्यांना मराठा समाजाबद्दल किती संवेदना आहेत हे मराठा समाजाला माहित आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्याकाळात मराठा समाजाला आरक्षण दिलं. हायकोर्टात ते टिकलं. ते टिकवण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि आम्ही केलं, असे मुख्यमंत्री म्हणाले. तर सुप्रीम कोर्टात ते प्रकरण गेल्यानंतर त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होतं? उपसमितीचे अध्यक्ष कोण होतं? त्यांनी हे आरक्षण टिकवलं नाही. खरंतर मराठा समाजाच्या आरक्षणाचे मारेकरी खऱ्या अर्थाने तुम्ही आहात. त्यामुळे तुम्हाला मराठा समाजाच्या आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असा घणाघातही त्यांनी केला.

Published on: Oct 31, 2023 05:44 PM