म्हणून उद्धव ठाकरे यांना जनतेनं घरी बसवलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खोचक टीका

म्हणून उद्धव ठाकरे यांना जनतेनं घरी बसवलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खोचक टीका

| Updated on: Feb 14, 2023 | 10:09 PM

कोणी कितीही कांगावा करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी..., काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

मुंबई : मातोश्री समोर पक्षात सहभागी होण्यासाठी रांग लागली असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी ते म्हणाले शिंदे गटात रोज नगर सेवक, तालुका प्रमुख आणि बाळासाहेबांचे शिवसैनिक सहभागी होतायंत, जनतेच्या मनातील सरकार स्थापन केलं म्हणून मोठ्या संख्येने सरकारवर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश करत आहेत. कोण काय म्हणतंय हे जाणून घेण्याची मला आवश्यकता नाही तर ही वस्तुस्थिती आहे. शिवसेना-भाजप युतीचं सरकार आम्ही स्थापन केलं आणि जनतेला हा निर्णय आवडला, पोहोचपावती मिळत आहे. गेल्या ६ महिन्यात जे काम केलं आहे ते काम बोलत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, कोणी कितीही कांगावा करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी लोकांना काम करणारं सरकार आणि लोकं हवे आहेत. काम न करणारे लोकं जनतेला नको म्हणून जनतेने त्यांना घरी बसवले, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Published on: Feb 14, 2023 10:04 PM