स्वप्न पाहणं चांगलंय, पण...; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सुनावलं

स्वप्न पाहणं चांगलंय, पण…; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सुनावलं

| Updated on: May 02, 2023 | 9:13 AM

VIDEO | मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर साधला जोरदार निशाणा, म्हणाले, 'सकाळी एकाला, दुपारी दुसऱ्याला...'

मुंबई : मुंबईत महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा झाली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर सडकून टीका केली. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील विरोधकांना फटकारल्याचे पाहायला मिळाले. अनेकांना मुख्यमंत्री व्हायची स्वप्न पडायला लागली आहेत. तर सकाळी एकाला, दुपारी दुसऱ्याला मुख्यमंत्री व्हायची स्वप्न पडतात, असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. राज्यातील जनतेला आरोप-प्रत्यारोप खालच्या दर्जाची भाषा आवडत नाही, असे म्हणत पोटदुखी होती असेल तर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखना आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना जोरदार टोला लगवला आहे. यानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, स्वप्न पाहत राहूदे, स्वप्न पाहणं चांगलं असतं, आमदार असो की मुख्यमंत्री कोणाला बनवायचं तर कोणाला त्या खुर्चीतून उतरवायचं हे पूर्ण जनतेच्या हातात असतं, असे खोचकपणे वक्तव्य करत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जोरदार फटकारले आहे.

Published on: May 02, 2023 09:13 AM