शिंदे सरकारचा मोठा निर्णय, मुंबईतील ‘या’ टोलनाक्यांवर टोलमाफी; कधीपासून अंमलबजावणी?

मुंबईत प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवर संपूर्णपणे टोल माफी देण्यात येणार आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

शिंदे सरकारचा मोठा निर्णय, मुंबईतील 'या' टोलनाक्यांवर टोलमाफी; कधीपासून अंमलबजावणी?
| Updated on: Oct 14, 2024 | 11:43 AM

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय शिंदे सरकारने दिला आहे. मुंबईतील वाशी, दहिसर, ऐरोली, आनंदनगर आणि एलबीएस मुलूंड या टोल नाक्यांवर टोल माफी देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळात ही मोठी घोषणा केली आहे. मुंबईत एमएसआरडीसीने ५५ उड्डाणपुलांची उभारणी केली. या पुलांचा खर्च वसूल करण्यासाठी मुंबईच्या प्रवेशद्वारांवर सर्वप्रथम टोलनाके उभारण्यात आले होते. पुल उभारणीचे काम अंतिम टप्यात येताच टोलनाके उभारण्यासाठी १९९९ मध्ये निविदा काढण्यात आली होती. त्यानंतर २००२ मध्ये हे पाचही टोलनाके सुरु करण्यात आली होती. त्यानंतर मुंबईमध्ये प्रवेशद्वारावर टोल वसुली सुरू झाली होती. गेल्या २२ वर्षांपासून मुंबईच्या प्रवेशद्वारांवर टोल आकारण्यात येत आहे. दरम्यान, मुंबईतील सर्व टोल माफ करण्यात यावे, यासाठी राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाकडून वारंवार आंदोलन करण्यात येत होते. याकरता अनेकदा राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची देखील भेट घेतली होती.

Follow us
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका.
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी.
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'.
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले...
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले....
सिद्दीकींच्या हत्येमागे बिश्नोई गँग? 'जो सलमान-दाऊद की हेल्प करेगा...'
सिद्दीकींच्या हत्येमागे बिश्नोई गँग? 'जो सलमान-दाऊद की हेल्प करेगा...'.
शिंदे सरकारचा मोठा निर्णय, मुंबईतील 'या' टोलनाक्यांवर आजपासून टोलमाफी
शिंदे सरकारचा मोठा निर्णय, मुंबईतील 'या' टोलनाक्यांवर आजपासून टोलमाफी.
शिंदे सरकारची मोठी घोषणा, आज रात्रीपासून 'या' वाहनांना टोलमाफी
शिंदे सरकारची मोठी घोषणा, आज रात्रीपासून 'या' वाहनांना टोलमाफी.
मराठा कार्यकर्ते अन् भुजबळ समर्थक आमने-सामने, 44 जणांवर गुन्हा दाखल
मराठा कार्यकर्ते अन् भुजबळ समर्थक आमने-सामने, 44 जणांवर गुन्हा दाखल.
सिद्दिकींची भर पावसात अंत्ययात्रा, झिशानच्या डोळ्यात अश्रू, दुःख अनावर
सिद्दिकींची भर पावसात अंत्ययात्रा, झिशानच्या डोळ्यात अश्रू, दुःख अनावर.
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद.