Shiv Sena Mla Disqualification Decision : खरी शिवसेना शिंदेचीच, कोणते १६ आमदार पात्र? बघा यादी

Shiv Sena Mla Disqualification Decision : खरी शिवसेना शिंदेचीच, कोणते १६ आमदार पात्र? बघा यादी

| Updated on: Jan 10, 2024 | 6:57 PM

Shiv Sena Mla Disqualification Decision : शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज अंतिम निकाल जाहीर केला. या निकालामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळालाय. कोणते १६ आमदार पात्र? बघा यादी

मुंबई, १० जानेवारी २०२४ : शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज अंतिम निकाल जाहीर केला. या निकालामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळालाय. तर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे सर्व 16 आमदार पात्र ठरवलं आहे. यामध्ये एकनाथ शिंदे (ठाणे), तानाजी सावंत (भूम परंडा), प्रकाश सुर्वे (मागाठाणे, मुंबई), बालाजी किणीकर (अंबरनाथ, ठाणे), लता सोनावणे (चोपडा, जळगाव), अनिल बाबर (खानापूर), यामिनी जाधव (भायखळा, मुंबई), संजय शिरसाट (छत्रपती संभाजीनगर पश्चिम), भरत गोगावले (महाड, रायगड), संदीपान भुमरे (पैठण), अब्दुल सत्तार (सिल्लोड), महेश शिंदे (कोरेगाव), चिमणराव पाटील (एरंडोल, जळगाव),संजय रायमूलकर (मेहेकर), बालाजी कल्याणकर (नांदेड उत्तर) आणि रमेश बोरणारे (वैजापूर) हे सर्व शिंदे गटाचे आमदार पात्र ठरले आहेत.

Published on: Jan 10, 2024 06:57 PM