तर राजकारणातून संन्यास घेईल… शिवसेनेच्या चर्चेतील नेत्याचं मोठं वक्तव्य
जळगावातील बीलवाडी येथील विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाषणात जोरदार फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळालं. पुढे ते असेही म्हणाले, गरीबी मी जवळून पाहिली आहे, सोन्याचा चमचा घेवून मी जन्माला आलो नाही. मी सर्व साधारण माणूस आहे.
जळगाव, ८ फेब्रुवारी २०२४ : आपल्या मतदारसंघात कोणत्याही गावात जा.. जर कोटीच्या खाली काम निघाले तर राजकारणातून संन्यास घेईल, विरोधकांपेक्षा कणभर काम जरी जास्त केलेलं नसेल तर आमदारकीसाठी फॉर्म भरणार नाही, या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना ओपन चॅलेंज केलं आहे. जळगावातील बीलवाडी येथील विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाषणात जोरदार फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळालं. पुढे ते असेही म्हणाले, गरीबी मी जवळून पाहिली आहे, सोन्याचा चमचा घेवून मी जन्माला आलो नाही. मी सर्व साधारण माणूस आहे. याला जेलमध्ये टाका, याला त्रास द्या…हा धंदा मी आयुष्यभर केला नाही. नुसतं मत मागायचं… काम करायचं नाही, बोंब पडायची नाही आणि नुसती टीका करायची, असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी गुलाबराव देवकर यांच्यावर शरसंधान साधले.