‘आम्ही खेकडे नाही, तर 50…’, शिंदे गटाचं उद्धव ठाकरे यांच्या ‘त्या’ टीकेला प्रत्युत्तर
VIDEO | 'डालड्याचा डबा म्हणा, नाहीतर खेकडे म्हणा, पण...', शिंदे गटाचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार
मुंबई : गेल्यावर्षी मुसळधार पावसात माझ्या नेतृत्वाखालील सरकार वाहून गेलं नाही. खेकड्यांनी धरण फोडलं. खेकड्याला कितीही सरळ चालवण्याचा प्रयत्न केला तरी तोतिरकाच चालतो, अशी सडकून टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटावर केली. खेकड्यांनीच आपलं सरकार फोडलं असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संजय राऊत यांनी एक मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी भाजपसह एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर टीका केली. या केलेल्या टीकेवर शिंदे गटाकडून तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यात आलंय. ‘आम्ही खेकडे नाही. तर 50 वाघ आहोत. त्याचमुळे आम्ही उठाव केला आणि बाहेर पडलो. त्यांनी कितीही दुषणं लावली तरी देखील काही फरक पडत नाही. आम्ही त्यांना वारंवार सांगितलं घरी बसू नका. बाहेर पडा. घरी बसून सरकार चालत नाही. पण त्यांनी ऐकलं नाही. आम्ही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो पण त्यांच्या आजूबाजूला सगळे लोंबते आहेत.’, , असा पलटवार शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे.