‘संजय राऊत यांना भविष्य सांगण्याची सवय, पण त्याला कवडीची किंमत नाही’, शिंदे गटातील आमदारानं डिवचलं
VIDEO | 'सकाळचा भोंगा वाजवायची सवय संजय राऊत यांची', शिंदे गटातील आमदारानं संजय राऊत यांना घेरलं, काय केलं टीकास्त्र?
मुंबई, ८ ऑगस्ट २०२३ | संजय राऊत यांना भविष्य सांगण्याची सवय लागली आहे. पण संजय राऊत यांच्या वक्तव्याला कवडीचीही किंमत नाही, असे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हणत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत यांना आता काय काम धंदा राहिलेलं नाहीत. त्यांनी भविष्य सांगण्याचा नवीन व्यवसाय सुरू केला असावा आधी सांगितले होते, एक महिन्यात सरकार पडेल मग म्हणाले दोन महिन्यात पडेल, सहा महिन्यात पडेल पण सरकार चालतंय त्यांचं पितळ ऊघडं पडलं त्यामुळे आता त्यांनी हेच काम करत राहावं पूर्ण बहुमताने हे सरकार पुन्हा सत्तेत येईल, असे म्हणत संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे. तर उद्धव ठाकरे यांनी मोदींनी काय करायला हवं, याचा सल्ला देऊ नये, काय तेवढी त्यांची लायकी नाहीये, असेही ते म्हणाले. तर राज्यपाल म्हणजे काय सकाळचा भोंगा आहे काय उठला आणि वाजायला सुरुवात झाली, भोंगा वाजवायची सवय संजय राऊत तुमची, राज्यपालांची नाहीये, ते घटनात्मक पद आहे ते शांत राहून बरोबर आपलं काम करतात, असे म्हणत त्यांनी राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला.