‘मेहनती, प्रमाणिक, निडर’… मातोश्रीसमोर बॅनरबाजी करत उद्धव ठाकरे यांना पुन्हा कुणी डिवचलं?
VIDEO | ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वाद पुन्हा उफाळून येणार? उद्धव ठाकरे यांच्या बांद्रा येथील मातोश्री निवासस्थानासमोर बॅनरबाजी करत उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांना कुणी डिवचलं?
मुंबई, १९ ऑगस्ट २०२३ | आगामी लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीकडून तयारी सुरु आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून सर्व ४८ जागांचा आढावा घेणं सुरू आहे. अशातच उद्धव ठाकरे यांच्या बांद्रा येथील मातोश्री समोरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर लावण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांच्या घरासमोरच बॅनरबाजी करून शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या विभाग क्रमांक ७ च्या वतीने हे बॅनर लावण्यात आले आहेत. शिंदे गटाचे प्रवक्ते आणि नेते किरण पावसकर तसेच कुणाल सरमळकर यांनी हे बॅनर लावले आहेत. मेहनती, प्रामाणिक आणि निडर अशा आशयाचे हे बॅनर पावसकर आणि सरमळकर यांच्याकडून लावण्यात आले आहेत. तर लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून आढावा बैठका घेतल्या जात आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी या मतदारसंघाचा आढावा उद्धव ठाकरे घेत आहेत. यानिमित राज्यातून आलेल्या शिवसैनिकांचे हे बॅनर लक्ष वेधून घेत आहेत. इतकेच नाहीतर हे बॅनर चर्चेचा विषयही ठरत आहे.