मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि…., कुठं घडला प्रकार?
गेल्या दहा दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर त्यांच्याच समोर क्रॅश झाल्याचा प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचल्याची बातमी समोर आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना बारामती दौऱ्याकरता घेण्यासाठी महाडमध्ये हेलिकॉप्टर आले होते. परंतु सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर त्यांच्याच समोर क्रॅश झाल्याचा प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचल्याची बातमी समोर आली आहे. शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं एक चाक हेलिपॅडवर खचल्यामुळे हेलिकॉप्टर एका बाजुला झुकलं. वसईमधील टोकपाडा परिसरात ही घटना घडली. वसईमधील टोकपाडा येथील हेलिपॅडवर हा प्रकार घडला. महायुतीचे उमेदवार हेमंत सावरा यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वसईमध्ये आहेत.
Published on: May 13, 2024 07:07 PM
Latest Videos