शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, चहाच्या टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन अन्...

शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, चहाच्या टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन अन्…

| Updated on: Apr 23, 2024 | 10:15 AM

स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नवा खुलासाच केला आहे. बंडाच्या वेळी आपण स्वतः वसईच्या एका चहाच्या टपरीवरून उद्धव ठाकरेंना कॉल केला, यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची दिलेली ऑफर नाकारली असल्याचे शिंदेंनी सांगितले. एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला...

एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडलाय. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नवा खुलासाच केला आहे. बंडाच्या वेळी आपण स्वतः वसईच्या एका चहाच्या टपरीवरून उद्धव ठाकरेंना कॉल केला, यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची दिलेली ऑफर नाकारली असल्याचे शिंदेंनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंसंदर्भात मोठे गौप्यस्फोट केले आणि बंडाची कहाणी देखील सांगितली. सूरतला जात असताना ठाकरेंना फोन केला, त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली. पण ही ऑफर नाकारल्याचे शिंदेंनी एका वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय. तर ही ऑफर नाकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत भाजप नेत्यांना फोन केला. आपण सरकार स्थापन करू, शिंदे यांच्या बरोबर का जाताय? असा सवाल उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आला. यादरम्यान, आता उशीर झाला असल्याचे उद्धव ठाकरे यांना दिल्लीतून सांगण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वृत्तपत्राच्या मुलाखतीतून सांगितले.

Published on: Apr 23, 2024 10:14 AM