Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबद्दल महिलांना समाधान; म्हणाल्या, शेठने सुरू केलेली योजना…
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ होत आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी बचत गट लाभार्थी महिला, विहीर अनुदान अशा विविध लाभार्थी महिलांना धनादेश वाटप करण्यात येणार आहेत,
छत्रपती संभाजीनगर येथील सिल्लोडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ होत आहे. त्याचबरोबर महिलांना लाडकी बहीण योजनेचे मंजुरी पत्र देण्यात येणार आहे. बचत गट लाभार्थी महिला, विहीर अनुदान अशा विविध लाभार्थी महिलांना धनादेश वाटप करण्यात येणार आहेत, लाडकी बहीण योजना चांगली आहे. शेठने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. ही योजना बंद पडणार नाही अशी प्रतिक्रिया महिला लाभार्थ्यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ होत आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सिल्लोड येथे होणाऱ्या या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. अब्दुल सत्तार यांनी केलेल्या या आवाहनानंतर मोठ्या संख्येने लोक आपली हजेरी लावताय.