मुख्यमंत्री शिंदेंची संजय राऊतांना कायदेशीर नोटीस, 3 दिवसांत माफी मागा अन्यथा...

मुख्यमंत्री शिंदेंची संजय राऊतांना कायदेशीर नोटीस, 3 दिवसांत माफी मागा अन्यथा…

| Updated on: May 29, 2024 | 3:45 PM

लोकसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अफाट पैशांचा वापर केला, असा मोठा दावा सामनाच्या रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी केला होता. इतकंच नाहीतर प्रत्येक मतदारसंघात एकनाथ शिंदेंनी किमान २५ ते ३० कोटी रूपये वाटले असा गंभीर आरोप देखील संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला होता.

तीन दिवसांमध्ये बिनशर्त माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अफाट पैशांचा वापर केला, असा मोठा दावा सामनाच्या रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी केला होता. इतकंच नाहीतर प्रत्येक मतदारसंघात एकनाथ शिंदेंनी किमान २५ ते ३० कोटी रूपये वाटले असा गंभीर आरोप देखील संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला होता. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायदेशीर नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कायदेशीर नोटीसनंतर संजय राऊत यांनी जर माफी मागितली नाही तर त्यांच्यावर मानहानीचा दावा करणारा खटला दाखल करण्यात येणार असल्याचेही सांगितले जात आहे.

Published on: May 29, 2024 03:45 PM