BIG BREAKING | राज्य मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात मोठी बातमी, ठरलं? ‘या’ दिवशी होणार मंत्रिमंडळाचा विस्तार
VIDEO | अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची नेमकी काय झाली चर्चा?
मुंबई, 6 ऑगस्ट 2023 | राज्य मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाचा पुढील विस्तार कधी होणार? याकडे जनतेसह राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार आज होणार की उद्या होणार? या आठवड्यात की पुढच्या आठवड्यात होणार? या महिन्यात की पुढच्या महिन्यात होणार? अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू असताना पुढील आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, विश्वसनीय सुत्रांकडून अशी माहिती टिव्ही ९ मराठीला मिळाली आहे. यासंदर्भात दिल्लीत केंद्रीय नेतृत्वासोबत राज्यातील नेत्यांची चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पुणे दौऱ्यावर आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील काल अमित शाह यांची बैठक घेतली. यावेळी जवळपास ४० मिनिटं त्यांच्यात चर्चा झाली मंत्रिमंडळासंदर्भातील चर्चा झाल्याची शक्यता असताना आता या मंत्रिमंडळामध्ये नेमकी कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.