मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नवे आदेश, पडद्यामागे हालचाली वाढल्या

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नवे आदेश, पडद्यामागे हालचाली वाढल्या

| Updated on: Jan 21, 2024 | 11:10 AM

मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. दुसरीकडे मुंबईतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही हलचाली वाढल्याचे पाहायला मिळाले. सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बैठक घेतली आणि जात प्रमाणपत्राबद्दल काही नवीन आदेश दिलेत.

मुंबई, २१ जानेवारी २०२४ : मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांसह मुंबईच्या दिशेने शनिवारी जालन्यातील अंतरवाली सराटी येथून रवाना झालेत. तर दुसरीकडे मुंबईतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही हलचाली वाढल्याचे पाहायला मिळाले. सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बैठक घेतली आणि जात प्रमाणपत्राबद्दल काही नवीन आदेश दिलेत. या बैठकीत सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, बच्चू कडू यांची ऑनलाईन उपस्थिती होती तर निवृत्त न्यायमूर्ती भोसले, गायकवाड उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्यात. ज्या गावात कुणबी नोंदी सापडल्या नाहीत तेथे फेरतपासणी करा, कुणबी नोंदी सापडल्यात त्यांचं जातप्रमाणपत्र युद्ध पातळीवर द्या…सापडलेल्या नोंदीसाठी गावोगावी जनजागृती करा, राज्य मागासवर्गीय आयोगाद्वारे सुरू असलेले सर्वेक्षण त्वरित पूर्ण करा तर वंशावळीसाठी तहशीलदाराच्या अध्यक्षतेखाली समिती करा, असे आदेश मुख्यमंत्री शिंदेंनी दिले. बघा स्पेशल रिपोर्ट…

Published on: Jan 21, 2024 11:10 AM