मराठा आरक्षणासाठी मुंबईत येण्यावर जरांगे ठाम, अन् सरकार अॅक्शन मोडमध्ये; पडद्यामागे घडतंय काय?
राज्य सरकारही अॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत असून पडद्यामागे राजकीय हालचालीही सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी मराठा आरक्षणासंदर्भात एक बैठक झाली. आज दुपारी तीन वाजता सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांची तातडीची बैठक बोलावली होती.
मुंबई, २० जानेवारी २०२४ : राज्य सरकारने 20 जानेवारीपर्यंत सर्व मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अशी मनोज जरांगे पाटील यांनी मागणी होती. ही मागणी पूर्ण न झाल्याने मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने सकाळी रवाना झाले आहेत. तर दुसरीकडे राज्य सरकारही अॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत असून पडद्यामागे राजकीय हालचालीही सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी मराठा आरक्षणासंदर्भात एक बैठक झाली. आज दुपारी तीन वाजता सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भातली संपूर्ण माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी जाणून घेतली. या बैठकीत सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, बच्चू कडू यांची ऑनलाईन उपस्थिती होती तर निवृत्त न्यायमूर्ती भोसले, गायकवाड उपस्थित होते. तर कायदेशीर प्रक्रिया सुरू असताना जरांगे पाटील घेत असलेली भूमिका ही टोकाची असल्याचं सरकारचं मत आहे. तर मुख्यमंत्री शिंदे हे आता मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती सूत्रांची आहे.