दिल्लीत मुख्यमंत्री शिंदे आणि अमित शाह यांची भेट! 20 मिनिटं झालेल्या भेटीत नेमकी काय चर्चा?

| Updated on: Sep 22, 2022 | 6:47 AM

Eknath Shinde meet Amit Shah in Delhi : दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये 20 मिनिटं चर्चा! चर्चेत नेमकं काय घडलं? मुख्यमंत्री अचानक अमित शाह यांच्या भेटीला का गेले?

संदीप राजगोळकर, प्रतिनिधी : दिल्ली दौऱ्यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यात बुधवारी रात्री उशिरा भेट झाली. तब्बल 20 मिनिटं शिंदे आणि शाह यांच्यात या भेटीदरम्यान चर्चा झाली. अमित शाह यांच्या दिल्लीतील (Delhi) निवासस्थानी जाऊन एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, काही खासदारही सोबत होते, असं सांगितलं जातंय. 20 मिनिटं झालेल्या चर्चेत नेमकं काय घडलं, यावरुन आता तर्क वितर्क लढवले जाऊ लागले आहेत. विशेष म्हणजे अमित शाह हे येत्या महिन्यात मुंबईचा दौरा करण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि शाह यांच्यात चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जातेय. आजपासून अमित शाह हे बिहार दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याआधीच अमित शाह यांची धावती भेट घेतली. अमित शाह हे बुधवारी रात्री खरंतर पुन्हा राज्यात परतणार होते. पण अचानक ते शाह यांच्या भेटीला गेल्याचं पाहायला मिळालंय.

 

रामदास कदमांच्या ‘त्या’ वादग्रस्त व्यक्तव्याविरोधात शिवसैनिक आक्रमक, पुण्यात जोडेमारो आंदोलन
दरवाजे मोकळेत म्हणायचं आणि पाठीमागून माणसं पाठवयची!’ उद्धव ठाकरेंवर कुणाचा आरोप?