'हम तो ऐसे बदनाम है की बदनामी...', गुलाबराव पाटलांचा शेरोशायरीतून विरोधकांवर निशाणा

‘हम तो ऐसे बदनाम है की बदनामी…’, गुलाबराव पाटलांचा शेरोशायरीतून विरोधकांवर निशाणा

| Updated on: Oct 25, 2024 | 1:06 PM

एकनाथ शिंदे यांच्या शिवेसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांना पक्षाकडून जळगाव येथे उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर त्यांनी पक्षाचे आभार व्यक्त केले. तर आपल्या विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करताना आयोजित करण्यात आलेल्या सभेत मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले.

जळगावात मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर शेरोशायरीतून निशाणा साधला आहे. विरोधक आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र विरोधकांना माझा इशारा आहे, बदनाम तो वो होते है जो बदनामी से डरते है… मगर हम तो ऐसे बदनाम है की बदनामी हमसे डरती है.. असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना शेरोशायरीच्या माध्यमातून खोचक टोला लगावला. पुढे ते असेही म्हणाले, प्रमोद महाजन भाषणात नेहमी म्हणायचे.. हवा कितनी भी तेज हुई… टायर मे हवा नही भरी जा सकती… उसके लिये नोजल पंप की जरुरत होती है. त्यामुळे आपली हवा आहे. पण नोझल पंप तुम्ही आहात. नाही तर..बिनधास्त राहाल..झोपून जाल अस काम करू नका…, असं आवाहन गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांसह जनतेला केलं. काही काही लोकं म्हटले की गुलाबराव पाटील यांची हवा संपली. पण ही जी गर्दी आहे हेच माझे टॉनिक आहे. मी 59 महिने तुमच्या करिता काम केलं.. तुम्ही फक्त 1 महिना माझ्यासाठी काम करा.. एवढीच विनंती मी तुम्हाला करतो..असं गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना म्हटलं.

Published on: Oct 25, 2024 01:06 PM