वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची हजेरी, दोघे एकाच मंचावर अन्…
एकीकडे रामगिरी महाराजांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यात तणावाचं वातावरण आहे तर नाशिकच्या सिन्नरमधील पंचालेन येथे हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात महंत रामगिरी महाराज आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचावर बघायला मिळाले. यावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडून महंत रामगिरी महाराजांच्या कामांचं कौतुकही करण्यात आले आहे.
रामगिरी महाराज यांनी आपल्या एका प्रवचनादरम्यावन पैगंबरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले. या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातील काही ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालंय. इतकंच नाहीतर तर राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे पडसाद उमटताना दिसताय. छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर येथे मोठा जमाव रस्त्यावर उतरून रामगिरी महाराज यांच्याविरोधात आक्रमक झाला आहे. वैजापूर, येवल्यात रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रामगिरी महाराज नाशिकमध्ये एकाच मंचावर असल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजपचे नेते गिरीश महाजन, माजी खासदार सुजय विखे पाटील देखील मंचावर उपस्थित होते. शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे, सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे हे देखील यावेळी हजर होते.

बारामतीत सर्वपक्षीय मोर्चाला सुरुवात, काय म्हणाले धनंजय देशमुख? पाहा

सतीश भोसलेवर गुन्हा दाखल, मात्र अटक कधी? शिरूरमध्ये जनआक्रोश मोर्चा

'छावा' पाहून पसरली अफवा अन् औरंगजेबाचा खजिना लुटण्यासाठी झुंबड

हरिणाच्या मटणासाठी मारहाण, धसांचा कार्यकर्ता 'खोक्या'ची दहशत; काय घडल?
