शिवेसना बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आमदार, खासदारांसह पदाधिकाऱ्यांना दिले थेट ‘हे’ आदेश, म्हणाले…
VIDEO | मुख्यमंत्र्यांनी तातडीने बोलावलेल्या बैठकीतून शिवसेना आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांना काय दिले आदेश?
मुंबई : ‘कुणी कितीही कुरघोडी करू द्या, पुन्हा युतीचं सरकार आणायचं’, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना बैठकीतून शिवसेना आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काश्मीर दौऱ्यातून परतल्यानंतर तातडीने शिवसेनेच्या आमदार-खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत आगामी निवडणुका सेना-भाजप युतीत लढणार असल्याचाही निर्णय घेण्यात आला. संघटना मजबूत करण्याच्या शिंदे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्यात.भाजप शिवसेनेत कोणतेही मतभेद नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका, शिंदे यांनी अशाही सूचना दिल्यात तर भाजप सेनेतील वाद मिटवण्यासाठी समिती स्थापन करणार असल्याचे शिवसेना बैठकीनंतर शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. वरळीच्या एनएससीआय सभागृहामध्ये ही बैठक बोलावण्यात आली आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासह विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती.