प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

| Updated on: Aug 19, 2023 | 5:42 PM

VIDEO | राज्याकडून रतन टाटा यांचा सन्मान; महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार प्रदान, मुख्यमंत्री म्हणाले, 'रतन टाटा यांनी उद्योगरत्न पुरस्कार स्वीकारून पुरस्काराचा सन्मान अधिक उंचावलाय'

मुंबई, १९ ऑगस्ट २०२३ | महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार प्रसिद्ध उद्योगपती, टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांना आज प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन हा पुरस्कार दिला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत या पुरस्कारची घोषणा केली होती. महाराष्ट्र भुषण पुरस्काराच्या धरतीवर या वर्षीपासून ‘उद्योगरत्न पुरस्कार’ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्योपती रतन टाटा यांना हा पुरस्कार देण्यात आला. टाटा यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम झाला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री दीपक केसरकर हे उपस्थित होते. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि 25 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. हा पुरस्कार प्रदान केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री म्हणाले, ‘राज्य सरकारचा सर्वात मोठा पुरस्कार हा रतन टाटा यांना देण्याचा सरकारने निर्णय घेतला आणि रतन टाटा यांनी तो स्वीकारला याबद्दल मी टाटा ग्रुपला मनातून धन्यवाद देतो. टाटा ग्रुप देशासह जगभरामध्ये विविध सेक्टरमध्ये अतिशय कार्यरत आहेत. सर्वसामान्यांच्या वस्तूंपासून त्या महागड्या गाड्यापर्यंत तसेच एअरलाईन्सपर्यंत सर्व सेक्टरमध्ये टाटाचं नाव आहे. टाटा म्हणजे विश्वास, टाटा म्हणजे ट्रस्ट त्यामुळे आम्ही भाग्यवान आहोत की रतन टाटा यांनी तो पुरस्कार स्वीकारला. आणि तो स्वीकारून पुरस्काराचा सन्मान अधिक उंचावलाय’

Published on: Aug 19, 2023 05:41 PM