CM Shinde on Fadnavis Resign : देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याच्या इच्छेवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, मी त्यांच्याशी...

CM Shinde on Fadnavis Resign : देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याच्या इच्छेवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, मी त्यांच्याशी…

| Updated on: Jun 05, 2024 | 4:54 PM

महाराष्ट्रात भाजपच्या झालेल्या पराभवाची जबाबदारी आपण स्वीकारत असून केंद्रीय नेतृत्वाने आपल्यावर उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून बाजूला करावं, अशी भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. बघा काय म्हणाले शिंदे?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात भाजपच्या झालेल्या पराभवाची जबाबदारी आपण स्वीकारत असून केंद्रीय नेतृत्वाने आपल्यावर उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून बाजूला करावं, अशी भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘निवडणुकांमध्ये हार-जीत होत असते. जी निवडणूक झाली त्यात मतदानाची टक्केवारी पाहिली तर मविआला जागा जास्त मिळाल्या असल्या तरी मतांची टक्केवारी सारखी आहे. सगळ्यांचं जे काही यश-अपयश आहे, ती आमची सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. राज्यात देखील खूप चांगलं काम झालेलं आहे. देवेंद्र फडणवीस, मी, अजित पवार असतील, आम्हाला राज्यासाठी एकत्र काम करायचंय, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. तर देवेंद्र फडणवीस यांच्याशी नक्की बोलेन आणि राज्यासाठी आम्ही एकत्र काम करु. आम्ही एकत्र काम केलं आणि निवडणुकांचे जे निकाल आले त्याची आमची सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे कुणाच्या एकट्याची जबाबदारी आहे, त्यामुळे मी नक्की त्यांच्याशी बोलेन, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

Published on: Jun 05, 2024 04:54 PM