शासकीय रूग्णालयातील मृतांच्या घटनेवरून माजी आणि आजी मुख्यमंत्री आमने-सामने, काय केले आरोप-प्रत्यारोप?

शासकीय रूग्णालयातील मृतांच्या घटनेवरून माजी आणि आजी मुख्यमंत्री आमने-सामने, काय केले आरोप-प्रत्यारोप?

| Updated on: Oct 07, 2023 | 11:05 AM

tv9 marathi Special Report | नांदेडच्या शासकीय रूग्णालयातील मृतांच्या घटनेवरुन ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली, उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर एकनाथ शिंदे यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. माजी आणि आजी मुख्यमंत्री आलेत आमने-सामने

मुंबई, ७ ऑक्टोबर, २०२३ | उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नांदेडच्या घटनेवरुन बरसले. शिंदे सरकारमधील भ्रष्टाचारामुळं रुग्णालयात बळी गेल्याचा आरोप ठाकरेंनी केला. त्यानंतर शिंदेंनीही कोरोना काळातील हिशेब काढला. नांदेडच्या वैद्यकीय महाविद्यालयातील घटनेवरुन, माजी आणि आजी मुख्यमंत्री आमनेसामने आलेत. औषध खरेदीत सरकारचेच दलाल असून CBI चौकशी करा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. तर कोरोनात लोक मरत होते आणि उद्धव ठाकरे घरात बसून नोटा मोजत होते असा पलटवार मुख्यमंत्री शिंदेंनी केला. नांदेडमध्ये 48 तासांत 41 जणांचा मृत्यू झाला, औषधांच्या कमरतेमुळं जीव गेल्याचा आरोप होतोय. मात्र पालकमंत्रिपदासाठी मारामाऱ्या सुरु आहेत. औषधं खरेदीसाठी पैसे नाहीत, परदेशी वाऱ्या सुरु आहेत. भ्रष्टाचाराची साथ आल्यानंच बळी चाललेत, असा हल्लाबोल ठाकरेंनी केला. नांदेडच्या घटनेनंतर मुख्यमंत्री शिंदे किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री आले नाहीत. त्यामुळं एक फूल, दोन हाफ कुठं आहेत? अशी बोचरी टीका ठाकरेंनी केलीय. बघा स्पेशल रिपोर्ट काय केला हल्लाबोल

Published on: Oct 07, 2023 11:05 AM