त्याच दाढीनं जर काडी फिरवली तर तुमची… उद्धव ठाकरे यांच्या ‘त्या’ टीकेवर मुख्यमंत्र्याचा पटलवार
पक्ष चोरला, वडील चोरले असं लहान मुलांसारखे बोलताय, असं टीकास्त्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर डागलंय. तसंच दाढीने जर काडी फिरवली तर तुमची लंका जळून खाक होईल, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना दिलंय.
मुंबई, १२ फेब्रुवारी २०२४ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. पक्ष चोरला, वडील चोरले असं लहान मुलांसारखे बोलताय, असं टीकास्त्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर डागलंय. तसंच दाढीने जर काडी फिरवली तर तुमची लंका जळून खाक होईल, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या दाढीवरून केलेल्या टीकेवर दिलंय. ‘आमदार फुटत आहे, मला काय कळलं नव्हतं? असा सवाल करत मी पण हॉटेलमध्ये डांबून ठेवू शकलो असतो. हे आमदार जात असताना मला कळाले नव्हते का? मिंध्याची दाढी पकडून आणता आले नसते का? पण मी जेवढे सडके आहेत तेवढ्यांना जावू दिलं, असं मोठं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला तर या टीकेवर एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय. बघा नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?