Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांना माझी विनंती..., मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय केलं आवाहन?

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांना माझी विनंती…, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय केलं आवाहन?

| Updated on: Oct 30, 2023 | 3:01 PM

CM Eknath Shinde on Maratha Reservation : मुख्यमंत्री म्हणाले... 'कोणालाही फसवू इच्छित नाही, जी मागणी आहे ती देखील कायदेशीर, नियमामध्ये बसणारी असली पाहिजे. मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि इतर समाजावर अन्याय न करता आरक्षण देणार. त्यासाठी काम सुरुये'

मुंबई, ३० ऑक्टोबर २०२३ | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांना विनंती करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आवाहन केले आहे. जरांगे यांना मुख्यमंत्री म्हणाले, थोडावेळ सरकारला दिला पाहिजे. जी कुणबी प्रमाणपत्राची मागणी तुम्ही केलीय, त्यावर जस्टिस शिंदे समिती चांगल काम करत आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी स्वत:ची काळजी घ्यावी, सरकारलाही त्यांच्या तब्यतेची चिंता आहे. वैद्यकीय उपचार घेतले पाहिजेत. पाणी घेतलं पाहिजे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पुढे मुख्यमंत्री शिंदे असेही म्हणाले की, जरांगे पाटील यांचा मराठा समाजासाठीचा उभारलेला लढा सरकारने गांभीर्याने घतेला आहे. सरकार मराठा आरक्षणाबाबतीत अतिशय गंभीर आहे. म्हणून सर्व लोकांची महत्त्वाची बैठक बोलावली असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तर कोणालाही फसवू इच्छित नाही, जी मागणी आहे ती देखील कायदेशीर, नियमामध्ये बसणारी असली पाहिजे. टिकणारी असली पाहिजे. मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि इतर समाजावर अन्याय न करता आरक्षण देणारं. त्यासाठी काम सुरु असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Published on: Oct 30, 2023 03:01 PM