दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केल्या ‘या’ मोठ्या घोषणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोस येथील आंतरराष्ट्रीय परिषदेवरून मुंबईत परतले. मुंबईत आल्यानंतर त्यांनी मुंबई विमानतळावरच पहिलीच प्रतिक्रिया देत मोठी घोषणाही केली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावर विरोधकांनी शिंदेंना चांगलेच घेरल्याचे पाहायला मिळाले होते. असे असतानाही मुख्यमंत्री शिंदे आपला दावोस दौरा पूर्ण करून मुंबईत परतले. मुंबई विमानतळावर येताच त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. दावोस येथील हा दौरा अत्यंत यशस्वी झाला असून महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीने जगभरातील देशांच्या प्रतिनिधींशी महत्त्वाची चर्चा झाल्याचेही सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, दावोसच्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये राज्याच्या वतीने मी उपस्थित होतो. उद्योगमंत्री आणि संबंधित विभागही होता. दावोस दौऱ्याबद्दल खूप आनंदी आणि समाधानी आहे. विविध सेक्टरमध्ये जगभरातील देशांच्या प्रतिनिधींनी आपला कल दाखवला आणि त्यातून त्यांची आत्मियताही जाणवली. महाराष्ट्र सरकारवर विश्वास दाखवला. राज्यासाठी 1 लाख 37 हजार कोटींचे एमओयूही झाले आहेत. नुसते करार करायच्या यासाठी हा दौरा झाला नाही. त्यातून १ लाखांपेक्षा अधिक प्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरित्या रोजगार उपलब्ध होतील, अशाप्रकारे मुख्यमंत्र्यांनी मोठ्या घोषणाही केल्या.