मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पैसे देऊन माणसांची जुळवाजुळव? ऑडिओ क्लिप व्हायरल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची आज पैठणला सभा होणार आहे. मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांचा हा मतदार संघ आहे. या सभेसाठी मुख्यमंत्री गेल्यानंतर विमानतळापासून ते सभास्थळापर्यंत पोलीस तैनात असणार आहेत. 9 ते 10 हजार खुर्च्यां सभास्थळी लावण्यात आल्या आहेत. पण या सभेला पैसे देऊन माणसं आणली जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची आज पैठणला सभा होणार आहे. मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांचा हा मतदार संघ आहे. या सभेसाठी मुख्यमंत्री गेल्यानंतर विमानतळापासून ते सभास्थळापर्यंत पोलीस तैनात असणार आहेत. 9 ते 10 हजार खुर्च्यां सभास्थळी लावण्यात आल्या आहेत. पण या सभेला पैसे देऊन माणसं आणली जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. या संदर्भात सध्या एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यात पैसे देण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.