Maratha Reservation : ... ही अफवा, मुख्यमंत्री शिंदे नेमकं काय म्हणाले? तर जरांगे पाटील यांच्या मते सरसकट म्हणजे काय?

Maratha Reservation : … ही अफवा, मुख्यमंत्री शिंदे नेमकं काय म्हणाले? तर जरांगे पाटील यांच्या मते सरसकट म्हणजे काय?

| Updated on: Nov 10, 2023 | 12:50 PM

कुणबी नोंदींवरून मराठ्यांना दाखले देण्यास सुरूवात झाली आहे. तर सर्वच मराठ्यांना कुणबी दाखले देणार असल्याची अफवा असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या चर्चेनंतर पुन्हा सरसकट कुणबीवरून चर्चा सुरू झाली आहे. याच दरम्यान, शिंदे यांनी मोठं वक्तव्य केले आहे.

मुंबई, १० नोव्हेंबर २०२३ | कुणबी नोंदींवरून मराठ्यांना दाखले देण्यास सुरूवात झाली आहे. तर सर्वच मराठ्यांना कुणबी दाखले देणार असल्याची अफवा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या चर्चेनंतर पुन्हा सरसकट कुणबीवरून चर्चा सुरू झाली आहे. कुणबी नोंदीवरून मराठ्यांना देण्यात येणाऱ्या दाखल्यांवरून छगन भुजबल चांगलेच आक्रमक झालेत. याच दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केले आहे. सर्वच मराठ्यांना कुणबी दाखले दिले जाताय ही अफवा असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. त्यावर मनोज जरांगे पाटील आपण २४ डिसेंबरला बोलणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जी चर्चा झाली ती माध्यमांसमोर सार्वजनिक झाली. त्यामुळे सरकारला दिलेल्या मुदतीनंतर बोलणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. तर जे शिंदे म्हणाले तेच उपमुख्यमंत्री फडणवीसही म्हणालेत.

Published on: Nov 10, 2023 12:50 PM