आता उशीर झालाय, असं ठाकरेंना दिल्लीतून सांगण्यात आलं; मुख्यमंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट
शिंदे यांच्या बरोबर का जाताय? असा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सवाल उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आला. यादरम्यान, आता उशीर झाला असल्याचे उद्धव ठाकरे यांना दिल्लीतून सांगण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वृत्तपत्राच्या मुलाखतीतून सांगितले
सूरतला निघाल्यावर मुख्यमंत्री पदाची उद्धव ठाकरे यांच्याकडून ऑफर आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तर ही ऑफर नाकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत भाजप नेत्यांना फोन केला, असं सांगत एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा गौप्यस्फोट केला. तर आपण सरकार स्थापन करू, शिंदे यांच्या बरोबर का जाताय? असा सवाल उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आला. यादरम्यान, आता उशीर झाला असल्याचे उद्धव ठाकरे यांना दिल्लीतून सांगण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वृत्तपत्राच्या मुलाखतीतून सांगितले. याच मुलाखतीतून अनेक मोठ-मोठे गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शिंदे यांनी मुलाखतीत असेही सांगितले की, महाविकास आघाडीच्या काळात देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, आशिष शेलारांना अटक करण्याचा डाव होता. तर लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.