मुख्यमंत्री शिंदेंचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द, मंत्रिमंडळ बैठकही कॅन्सल; कारण नेमकं काय?

मुख्यमंत्री शिंदेंचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द, मंत्रिमंडळ बैठकही कॅन्सल; कारण नेमकं काय?

| Updated on: Oct 08, 2024 | 12:52 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळी साडे अकरा वाजता मुंबई विमानतळावरून सोलापूरमध्ये होणाऱ्या वचनपूर्ती सोहळ्यासाठी येणार होतो. हा कार्यक्रम साडेबारा वाजता होणार होता. त्याची संपूर्ण तयारी प्रशासनाकडून करण्यात आली होती. मात्र अचनाक मुख्यमंत्र्यांची प्रकृती बिघडल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठीक नसल्याने शिंदेंचे आजचे सर्व कार्यक्रम हे रद्द करण्यात आले आहे. तर यासह आज होणारी मंत्रिमंडळ बैठक देखील रद्द झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांचे आज होणारे सर्व नियोजित कार्यक्रम, दौरे हे रद्द करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे त्यांच्या निवासस्थानी असल्यची माहिती मिळतेय. प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी सोलापूर दौरा रद्द केला आहे. तर विधानसभा निवडणुका तोंडावर असताना आजची महत्त्वाची मंत्रिमंडळ बैठकही रद्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर दौरा हा पाचव्यांदा रद्द झाल्याची माहिती मिळतेय. आज सोलापूरमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम पार पडणार होता. या कार्यक्रमाची तयारीही पूर्ण झाली असून मोठ्या संख्येने महिल्या दाखल होत आहेत. मात्र आता मुख्यमंत्री नसताना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेतला जाण्याची शक्यता आहे.

Published on: Oct 08, 2024 12:52 PM