कल्याण पश्चिमेत पुन्हा शिवसेना vs भाजप? विधानसभेची जागा कोणाकडे जाणार? महायुतीत रस्सीखेच?

कल्याण पश्चिमेत पुन्हा शिवसेना vs भाजप? विधानसभेची जागा कोणाकडे जाणार? महायुतीत रस्सीखेच?

| Updated on: Aug 29, 2024 | 1:30 PM

महायुतीमध्ये कल्याण पश्चिम विधानसभेची जागा कोणाकडे जाणार? कल्याण पश्चिमेत पुन्हा सेना-भाजप आमने-सामने? कल्याण पश्चिमेत भाजप माजी आमदार नरेंद्र पवार यांचे वाढदिवसानिम्मित भावी आमदार म्हणून बॅनरबाजी करण्यात... आता शिवसेना गटाचे विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर कल्याण पश्चिमचे आमदार असून पुन्हा एकदा नरेंद्र पवार यांच्याकडून बॅनरबाजी करत विधानसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू

विधानसभेच्या निवडणुका जशा जवळ येत आहेत, तसे राज्याचं राजकारण पेटताना दिसतंय. ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा जागा वाटपावरून अनेक वाद उद्भवण्याची दाट शक्यता आहे. याचं कारण म्हणजे आता कल्याण पश्चिम येथेही भावी आमदार म्हणून भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांचे बॅनर लागलेत. त्यामुळे शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यात यंदाही राजकीय मतभेद अन् रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. सध्या कल्याण पश्चिम या ठिकाणी शिंदेंच्या सेनेचे विश्वनाथ भोईर हे विद्यमान आमदार आहे. गत निवडणुकीमध्ये भाजपाचे नरेंद्र पवार यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. 2014 मध्ये निवडून आलेले भाजपाचे नरेंद्र पवार आता पुन्हा एकदा या मतदारसंघावर दावा करू शकतात, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. त्यामुळे महायुतीमध्ये कल्याण पश्चिमेची जागा कोणाकडे जाते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुन्हा ही जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे गेली तर पवार हे पुन्हा बंडखोरी करणार का ते पाहणं औसुक्याचा ठरणार आहे. सध्या कल्याण पश्चिम परिसरात नरेंद्र पवार यांचे भावी आमदार म्हणून लागलेले बॅनर लावण्यात आले असून एकप्रकारचा राजकीय इशारा असल्याचे म्हटले जात आहे.

Published on: Aug 29, 2024 01:30 PM