‘३५० वर्षानंतर पुन्हा तोच योग’, शिवसेनेच्या या देशाव्याची होतेय सर्वत्र चर्चा, बघा व्हिडीओ
VIDEO | डोंबिवलीतील शिवसेनेच्या शाखेकडून शिवजंयतीनिमित्त विशेष देखावा साकारण्यात आला आहे तर या देखाव्याची होतेय चांगलीच चर्चा
ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती साजरी केली जात आहे. १९ फेब्रुवारी रोजी गेल्या महिन्यात मोठ्या उत्साहात शिवरायांची जयंती साजरी करण्यात आली. काही शिवप्रेमी तारखेनुसार तर काही जण तिथीनुसार शिवजंयती साजरी करतात. दरम्यान, डोंबिवलीतील शिवसेनेच्या शाखेकडून शिवजंयतीनिमित्त विशेष देखावा साकारण्यात आला आहे. ३५० वर्षानंतर पुन्हा तोच योग अशा आशयाचा हा देखावा असून एकाबाजूला भवानी माता, भवानी तलवार छत्रपती शिवाजी महाराज यांना देत असल्याचा प्रसंग दाखवण्यात आला आहे तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे हे धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्या हाती सुपूर्द करतानाचा प्रसंग दाखवण्यात आला आहे. सध्या शिवजंयतीनिमित्त केलेल्या या देखाव्याची डोंबिवलीमध्ये जोरदार चर्चा होताना दिसतेय. तर सोशल मीडियावर देखील हा देखावा व्हायरल होत आहे.
Published on: Mar 10, 2023 09:50 AM
Latest Videos