सदा सरवणकरांची माघार नाहीच, शेवटच्या क्षणापर्यंत धावाधाव पण…; राज ठाकरेंच्या घरी नेमकं काय झालं?
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काल दुपारी तीन वाजेपर्यंतची वेळ होती. तोपर्यंत मोठ्या घडामोडी घडल्या. सदा सरवणकर माघार घेणार असं चित्रही दिसलं मात्र राज ठाकरेंनी भेट नाकारली आणि अर्ज मागे न घेण्याचा निर्णय सदा सरवणकरांनी घेतला.
माहीममध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्याविरोधात शिंदेंच्या शिवसेनेने माघार घेतलीच नाही. माघार घेण्यासंदर्भात घडामोडी नक्की घडल्या मात्र राज ठाकरेंनी भेटीसाठी वेळच दिला नाही. त्यामुळे लढणार आणि जिंकणार असा विश्वास व्यक्त करत सदा सरवणकरांनी अर्ज कायम ठेवला. सोमवारी सकाळी पावणे बारा वाजता सदा सरवणकरांनी पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोन आल्याचे सांगत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितलं. दीड वाजता सदा सरवणकरांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. भेटीनंतर सरवणकरांनी सांगितले की, सर्व समीकरण राज ठाकरेंना समजावून सांगणार. यानंतर अडीच वाजता सदा सरवणकरांनी मुलगा समाधान सरवणकरांना राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर पाठवलं. पावणे ३ वाजता राज ठाकरेंच्या निवासस्थानावरून समाधान सरवणकर निघाले. या दोघांची घरं शेजारीच असल्याने मिनिट भराच्या आतच समाधान घरी आले. त्यानंतर सदा सरवणकर यांनी माध्यमांना सांगितलं राज ठाकरेंनी भेटच नाकारली. बघा स्पेशल रिपोर्ट

आमची बदनामी थांबवा; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण

फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल

कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार
