जुन्या जखमांची आठवण अन् गुलाबराव पाटलांनी काय दिला भाजपला सल्ला?
लोकसभेला आम्ही मदत करतोय. मात्र भाजपने यंदा 2019 च्या विधानसभेची पुन्नरावृत्ती होणार नसल्याचा शब्द दिल्याचेही गुलाबराव पाटील यांनी म्हटले. 2019 ला भाजप आणि शिवसेनेची युती होते, त्यावेळी ते दोघे एकत्रित लढले, नंतरच्या विधानसभा निवडणुकाही युतीमध्येच झाल्यात
शिंदेंचे नेते गुलाबराव पाटील यांनी युतीच्या जुन्या जखमांवर बोट ठेवत 2019 ची पुन्नरावृत्ती 2024 नको, असं म्हणत शिंदेंचे नेते गुलाबराव पाटील यांनी भाजपला आवाहन केलंय. लोकसभेला आम्ही मदत करतोय. मात्र भाजपने यंदा 2019 च्या विधानसभेची पुन्नरावृत्ती होणार नसल्याचा शब्द दिल्याचेही गुलाबराव पाटील यांनी म्हटले. 2019 ला भाजप आणि शिवसेनेची युती होते, त्यावेळी ते दोघे एकत्रित लढले. नंतरच्या विधानसभा निवडणुकाही युतीमध्ये झाल्या. मात्र अनेक ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात भाजपने अपक्ष उमेदवार उभे केल्याचा वाद चांगलाच गाजला होता. त्यावेळी जाहीर सभेत गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांच्यात बाचाबाचीही झाली होती. 2019 च्या निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदाच्या वादावरून मविआचा जन्म झाला. तेव्हा गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा पुन्नरूच्चार त्यांनी 2024 च्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा केलाय. बघा स्पेशल रिपोर्ट…