पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा पेच सुटला, सर्वपक्षीय टेन्शन मुक्त; मैदानात कोण कोण?

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा पेच सुटला, सर्वपक्षीय टेन्शन मुक्त; मैदानात कोण कोण?

| Updated on: Jun 12, 2024 | 5:46 PM

नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी अजित पवार गटाकडून महेंद्र भावसार, शिंदे गटाकडून किशोर दराडे, ठाकरे गटाकडून संदीप गुळवे हे मैदानात असतील तर मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणूक, मुंबई पदवीधर मतदारसंघ, कोकण पदवीधर मतदारसंघातून कोण मैदानात असणार?

कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीचा पेच अखेर सुटला असल्याचे समोर येत आहे. शिंदे यांच्या शिवसेनेतील संजय मोरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता भाजप उमेदवार निरंजन डावखरे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जोरदार तयारी सुरू असताना मनसेने मोठा यु-टर्न घेतल्याचे पाहायला मिळाले होते. मनसेच्या अभिजीत पानसे यांनी देखील माघार घेतली होती. दरम्यान, नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी अजित पवार गटाकडून महेंद्र भावसार, शिंदे गटाकडून किशोर दराडे, ठाकरे गटाकडून संदीप गुळवे हे मैदानात असतील तर मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणूक, मुंबई पदवीधर मतदारसंघ, कोकण पदवीधर मतदारसंघातून कोण मैदानात असणार? बघा व्हिडीओ….

Published on: Jun 12, 2024 05:46 PM