Shinde Group Candidate List : शिंदे गटाच्या पहिल्या यादीत ‘या’ 37 उमेदवारांना मिळणार संधी, बघा संभाव्य यादी
भाजपने पहिली यादी जाहीर केल्यानंतर त्या पाठोपाठ शिंदे गट शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली यादी तयार करण्यात आली आहे. आज या यादीवर शेवटचा विचारविनिमय केला जाणार आहे. त्यानंतरच शिंदे गटाकडून साधारण ३० ते ४० जणांची यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती मिळतेय.
येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात २८८ मतदारसंघांसाठी विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडणार आहे. तर या निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसण्यास सुरूवात केल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच काल (रविवारी २० ऑक्टोबर) भाजपकडून विधानसभेसाठी तब्बल ९९ उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर झाली. यामध्ये काही नव्या उमेदवारांना संधी देण्यात आली तर काहींचा पत्ता कट करण्यात आला आहे. दरम्यान, भाजपकडून पहिली उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेच्या ३० ते ४० जणांच्या उमेदवारीची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. यासोबतच अजित पवार गटाची पहिली यादी आणि शरद पवार गटातील ३३ जणांची नावं निश्चित झाली असून त्यांची पण पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बघा एकनाथ शिंदे गट शिवसेनेची संभाव्य यादी कोणाला कोणाला उमेदवारी मिळण्याची शक्यता?