'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची ठाकरे गटातील महिला नेत्यावर बोलताना जीभ घसरली

‘काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी…’, भरत गोगावलेंची ठाकरे गटातील महिला नेत्यावर बोलताना जीभ घसरली

| Updated on: Oct 11, 2024 | 4:46 PM

भरभाषणात टीका करताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांची जीभ घसरली आहे. भरत गोगावले यांचं भरभाषणातील एक वादग्रस्त वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत असून आता ते व्हायरल देखील होत आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांचं एक वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. भरत गोगावले हे व्यासपीठावर बोलत असताना त्यांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळत आहे. भरभाषणात टीका करताना भरत गोगावले यांची जीभ घसरली आहे. उद्धव ठाकरे गट शिवसेनेच्या स्नेहल जगताप यांच्यावर बोलत असताना नाव न घेता भरत गोगावले यांनी टीका केली. दरम्यान, भरत गोगावले यांचं भरभाषणातील हे वादग्रस्त वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत असून ते आता व्हायरल देखील होत आहे. ‘महात्मा ज्योतिबा फुले किंवा आम्ही केलेली काही थोडीफार मदत आणि प्रत्येक गावाचा विकास…मग सांगा तुम्हाला कोण पाहिजे?’, असं वक्तव्य भरत गोगावले यांनी करत उपस्थितांना सवाल केला आहे. पुढे भरत गोगावले असेही म्हणाले, तुम्हाला कोण पाहिजे? काम करणारा भाऊ पाहिजे की.. चुXXX बनवणारी बहीण पाहिजे? हे लक्षात ठेवा, असे भरत गोगावले म्हणत असताना त्यांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Oct 11, 2024 04:45 PM