आनंद दिघेंच्या मृत्यूवरून पुन्हा सवाल, संजय शिरसाटांचा मोठा दावा अन् रंगतोय नवा वाद
आनंद दिघे यांच्या मृत्यूवरून शिंदेंच्या शिवसेनेकडून सवाल उपस्थित करण्यात आले आहे. आनंद दिघेंना मारण्यात आलं आणि हार्ट अॅटकचं कारण देण्यात आलं, असं शिंदे गटाचे नेते, प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले. तर २३ वर्ष गप्प कसे राहिले... पुरावे द्या, असं आव्हान आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी दिलेत.
शिंदे गटाचे नेते, प्रवक्ते संजय शिरसाट यांनी आनंद दिघे यांना मारलंच गेलं, असा दावा करून पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली. सध्या धर्मवीर २ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून दिघेंना मारण्यातच आलं असं संजय शिरसाट यांनी म्हटल्यानंतर दोन्ही शिवसेनेत शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. दरम्यान, २०२२ मध्ये धर्मवीर हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी सुद्धा असेच आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. मात्र एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी २ मे २०२२ रोजी आनंद दिघे यांच्या मृत्यूवरून भाष्य केले आहे. ‘आनंद दिघेंना हृदयविकाराचा झटका आला. अॅक्सिडेंट झाला होता पायाला परंतू निदान जे केलेलं आहे ते हृदय विकाराच्या झटक्यानेच त्यांना मृत्यू झाला असं आहे.’ तर आनंद दिघे यांच्या मृत्यूवरून आरोप करणारे संजय शिरसाट हे पहिले नाही तर यापूर्वीही नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे यांनीही आनंद दिघे यांच्यासोबत काय झालं? हे सांगावं लागेल असं म्हटलं. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट