मुख्यमंत्र्यांनी विजय शिवतारे यांची पक्षातून हाकलपट्टी करावी, कुणी केली आक्रमक मागणी?
शिवसेना शिंदे गटाचे नेते, माजी आमदार विजय शिवतारे हे सतत प्रसिद्धी झोतात राहण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करत आहे. आज सुद्धा त्यांनी अत्यंत खालच्या भाषेमध्ये अजित पवार यांच्यावर टीका केल्याचा आरोप सचिन खरात यांनी केला.
मुंबई, १३ मार्च २०२४ : शिवसेना शिंदे गटाचे नेते, माजी आमदार विजय शिवतारे हे सतत प्रसिद्धी झोतात राहण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करत आहे. आज सुद्धा त्यांनी अत्यंत खालच्या भाषेमध्ये अजित पवार यांच्यावर टीका केल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केला. पुढे ते असेही म्हणाले की, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आणि घटक पक्ष यांचे सरकार आहे त्यामुळे युतीचा धर्म पाळला पाहिजे, मात्र तरीसुद्धा युतीचा धर्म न पाळता विजय शिवतारे सतत अजित पवार यांच्यावर टीका करत आहे. याची त्वरित दखल शिवसेनेने घ्यावी आणि तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी आक्रमक मागणीही सचिन खरात यांनी केली.
Published on: Mar 13, 2024 05:41 PM
Latest Videos