'एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम यांना आवर घातला पाहिजे', कुणी दिला मुख्यमंत्र्यांना खोचक सल्ला

‘एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम यांना आवर घातला पाहिजे’, कुणी दिला मुख्यमंत्र्यांना खोचक सल्ला

| Updated on: Mar 06, 2023 | 3:16 PM

VIDEO | 'ते सभा घेणार म्हणजे काय करणार ? शिव्या देणार? काही तरी चांगले कर...', उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यानं केली प्रश्नांची सरबत्ती, बघा व्हिडीओ

रत्नागिरी : उद्धव ठाकरे यांनी काल खेडमध्ये सभा घेतली, यानंतर शिवसेना नेते रामदास कदम यांनी १९ मार्च खेडमध्ये जाहीर सभा घेऊन व्याजासह हिशेब चुकता करणार असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर ठाकरे गटाकडून रामदास कदम यांच्यावर टीका करण्यात आली. हिशेब चुकता करणार आहे. व्याजासह देणार आहे. काय व्याज देणार आहे ? नेमकं काय करणार आहे? काय करायचे ते आम्ही काल केले आहे, असा खोचक टोला ठाकरे गटाचे नेते संजय कदम यांनी लगावला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही सल्ला देखील दिला आहे. ‘एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम यांना आवर घातला पाहिजे. ज्या शिवसेनाप्रमुखांमुळे रिक्षावाला आमदार झाला. दारू विकणारा रामदास कदम याला एवढी पदे मिळाली. आणखी काय द्यायला पाहिजे होते ?’, असेही ते म्हणाले.

Published on: Mar 06, 2023 03:16 PM