… हेच महाराष्ट्राचं दुर्देवं, मुख्यमंत्री शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका
आमदार अपात्रता सुनावणी प्रकरण क्रिमिनल मॅटर नाही. तर हे सिव्हील मॅटर असून त्यावर सुनावणी सुरू आहे. याप्रकरणातील सुनावणीमध्ये कुणीच आरोपी नाही. तसं तर शिवसेना शिंदे गट देखील ते १४ आमदार आरोप असल्याचे म्हणू शकते, पण नाही म्हणत, असे म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या गटाला खोचक टोला लगावलाय
मुंबई, १० जानेवारी २०२३ : राहुल नार्वेकर दोन वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाऊन भेटले. न्यायमूर्ती आरोपींना जाऊन भेटण्यासारखा हा प्रकार असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली होती. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्री राहिलेला माणूस अशी भाषा वापरू शकतो, हेच महाराष्ट्राचं दुर्देवं आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे त्यांचं अज्ञान आहे. आमदार अपात्रता सुनावणी प्रकरण क्रिमिनल मॅटर नाही. तर हे सिव्हील मॅटर असून त्यावर सुनावणी सुरू आहे. याप्रकरणातील सुनावणीमध्ये कुणीच आरोपी नाही. तसं तर शिवसेना शिंदे गट देखील ते १४ आमदार आरोप असल्याचे म्हणू शकते, पण नाही म्हणत, असे म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या गटाला खोचक टोला लगावलाय. उद्धव ठाकरे करत असलेल्या वक्तव्यांना कोणताही तर्क नाही अशी भाषा ते वापरत आहे. याचा अर्थ त्यांना त्याचा पराभव दिसू लागला आहे. निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलाय त्याप्रमाणे लोकशाहीत बहुमत यालाच महत्त्व आहे. म्हणून हा निर्णय राहुल नार्वेकर मेरिटवरच निर्णय देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.