‘अरे ज्यांनी निवडून दिलंय, त्यांना तर न्याय द्या’, नाव न घेता मुख्यमंत्र्यांचा घणाघात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते आज मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचं उद्धाटन करण्यात आलं आहे. कोस्टल रोड उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीएमसीचे अभिनंदन केले.
मुंबई, ११ मार्च २०२४ : मुंबईच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या आणि बहुचर्चित कोस्टल रोडवरून मुंबईकरांना उद्यापासून प्रवास करता येणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते आज मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचं उद्धाटन करण्यात आलं आहे. कोस्टल रोड उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीएमसीचे अभिनंदन केले. ‘मुंबईकरांच स्वप्न होतं. हे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल BMC चं अभिनंदन करतो. 10 किमीचा एक टप्पा झाला असून हा कोस्टल रोड दहीसर पर्यंत जाणार आहे. 53 किमीचा हा मार्ग आहे. सध्या दोन तास लागतात. पण आता एकातासापेक्षा कमी वेळ लागेल. प्रदूषण कमी होईल, इंधन बचत होणार आहे.’ यावेळी शिंदेंनी नाव न घेता विरोधकांवर जोरदार हल्लाबोलही चढवला. “कोणी म्हणतं, मी इथून निवडणूक लढवीन, अरे ज्या लोकांनी निवडून दिलय, त्यांना तर न्याय द्या. कोळी बांधवांना न्याय देऊ शकला नाहीत” अशी टीका शिंदेंनी नाव न घेता आदित्य ठाकरेंवर केली.